Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

team by team
April 10, 2022
in राज्य
0
राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
पुणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेसाठी दि.१२ एप्रिल मंगळवार रोजी नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, सचिव प्रा.दिलीप जानराव यांनी केले आहे.
महाराष्ट्र ऍथलेटिक्स संघटनेच्यावतीने दि.२१ ते २३ एप्रिल २०२२ दरम्यान पुणे येथे वरिष्ठ गटाच्या महिला व पुरुष तसेच २० वर्षाखालील मुले व मुलींसाठी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे. संघ निवडण्यासाठी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे १२ एप्रिल २०२२ मंगळवार रोजी सकाळी ६:३० वाजता जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत धावणे, चालणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, हातोडा फेक आदी क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे. स्पर्धेतून प्रत्येक क्रीडा प्रकारातील दोन विजयी महिला व पुरुष खेळाडूंची निवड राज्य संघटनेने दिलेल्या पात्रतेच्या निकषानुसार जिल्ह्याच्या संघात केली जाणार आहे. स्पर्धेला येताना २० वर्षाखालील खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक डॉ.मयुर ठाकरे, जगदीश वंजारी यांच्याशी संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

शहाद्यातील ऑईल मिलमधील स्पेअर पार्ट चोरट्यांना २४ तासात केले जेरबंद, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

धुळे शहरात ८ मे रोजी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, भगवान करनकाळ यांची नंदनगरीत सदिच्छा भेट

Next Post
धुळे शहरात ८ मे रोजी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, भगवान करनकाळ यांची नंदनगरीत सदिच्छा भेट

धुळे शहरात ८ मे रोजी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, भगवान करनकाळ यांची नंदनगरीत सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add