Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहाद्यातील ऑईल मिलमधील स्पेअर पार्ट चोरट्यांना २४ तासात केले जेरबंद, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

team by team
April 10, 2022
in क्राईम
0
शहाद्यातील ऑईल मिलमधील स्पेअर पार्ट चोरट्यांना २४ तासात केले जेरबंद, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा येथील ऑईल मिलमधील मशनरी स्पेअर पार्टसचे चोरट्यांना २४ तासात १ लाख ८३ हजार ७०० रूपये किमंतीच्या मुद्देमालासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. ३ ते ४ एप्रिल दरम्यान पंकज सुरेश जैन रा.श्रीराम कॉलनी, शहादा त यांचे शहादा शहारातील खेतीया रोड जवळील त्यांच्या मालकीचे नाकोडा ऑईल मिल येथुन फिर्यादी यांची एकुण ४ लाख ९५ हजार रुपये किंमतीचा ऑईल मिलचा मशनरी स्पेअर पार्टस मुद्देमाल अज्ञात चोरटयाने चोरुन नेला होता. त्यावरुन शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यात घरफोडीचे वाढते प्रमाण पहाता प्रभारी पोलीस अधीक्षक  विजय पवार यांनी सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.
त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वरील गुन्हा हा शहादा शहरातील संशयीत आरोपी अरमान मुख्तार शेख, शोएब शकील बागवान, इम्रान ऊर्फ ईमु लंगड्या शहा यांनी केला असुन ते सदर चोरी केलेला मुद्देमाल ते गरीब नवाज कॉलनी भागात विक्री करण्याचे बेतात आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि श्री. कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे १ पथक तयार करुन तात्काळ शहादा येथे रवाना केले.स्थागुशाचे पथकाने शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी भागात दोन संशयीत अरमान मुख्तार शेख रा. रहिम नगर, गरीब नवाज कॉलनी, शहादा, शोएब शकील बागवान रा. इक्बाल चौक टाऊन हॉल समोर, शहादा यांना ताब्यात घेत विश्वासात घेवुन वरील गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांचा साथीदार इम्रान ऊर्फ ईमु लंगड्या शहा रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा याच्यासह केला असल्याची कबुली दिली.
पथकाने अरमान मुख्तार शेख याच्याकडुन ८० हजार रु.किं.च्या एकुण ४ इलेक्ट्रीक मोटार तिच्यावर कंपनीचे नावाची प्लेट नसलेली एका मोटारीची किंमत २० रुपये प्रमाणे, १० हजार रु.किं.च्या. एकुण २ इलेक्ट्रीक मोटारीचे बाहेरील लोखंडी आवरण असलेली बॉडी त्यात तांब्याची तार नसलेली, ७ हजार ७०० रु.किं.ची एकुण ११ किलो तांब्याची तार प्रति किलो ७०० रुपये प्रमाणे हस्तगत केले.शोएब शकील बागवान याच्याकडून प्लास्टीकच्या गोणीत २० हजाराच्या २ इलेक्ट्रीक मोटार, १६ हजाराची ४० फुट कॉपर केबल, गुन्हयात वापरलेली  ५० हजाराची रु.किं.ची मोटार सायकल (क्र.एम.एच.१९,  एस.८५०३) असा  असा एकूण  १ लाच ८३ हजार ७०० यांच्याकडुन हस्तगत करुन दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोना गोपाल हिम्मत चौधरी, पुरुषोत्तम खिमलाल सोनार,विकास हिम्मत कापुरे, पोशि यशोदिप गोपाळ ओगले चापोना रमेश साळुंखे यांचे पथकाने केली असुन मुद्देमालासह आरोपी अटक करुन २४ तासाचे आत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल प्रभारी पोलीस अधीक्षक, नंदुरबार विजय पवार यांनी संपुर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी

Next Post

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

Next Post
राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add