शहादा l प्रतिनिधी
शरदचंद्र पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला झाल्याबद्दल शहादा येथे जाहीर निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नंदुरबार जिला अध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांचा मार्गदर्शनाखाली यावेळी शहादा शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, तालुका अध्यक्ष माधवराव पाटील, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, जिल्हा सरचिटणीस राजू वाघ, जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे संजय खंदारे, जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिटणीस जगदीश माळी, जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष छोटू कुवर, शहादा तालुका युवक महेंद्र वर, शहादा महिला तालुकाध्यक्ष रेशमा पवार, शहर कार्याध्यक्ष शुभम व तुषार समुद्रे, महेंद्र अहिरे, शेरा जगदेव, रोहित कुमार, वेडू जगदेव उपस्थित होते.










