नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर केंद्राची शिक्षण परिषद जि.प. शाळा आमली, आमलीबारी व खापरराण यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प. शाळा आगळी येथे झाली.


शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन बिस्नारीया होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून अक्कलकुवा तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी आर.आर.देसले उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आमली गावाचे ग्रा.पं. सदस्य भगतसिंग नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारती नाईक, पोलीस पाटील रायसिंग नाईक आदी उपस्थित होते. शिक्षण परिषदेची सुरूवात आमली शाळेच्या विद्यार्थीनींने इशस्तवन गायन करून केली. यावेळी शाळेत गुढी उभारण्यात आली.
शिक्षण परिषदेत मागील शिक्षण परिषदेचा आढावा घेण्यात आला. त्यानंत कर्तृत्वान महिलांचा सत्कार या विषयात आमली शाळेच्या विद्यार्थीनीने नृत्य सादर केली.तसेच निलीम पाडवी हिने मी सावित्रीबाई बोलतोय या विषयावर वकृत्व सादर केले. त्यानंतर सर्व उपस्थितीत कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला आहे. याची सुरूवात सौ.भारती नाईक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या स्वागताने करण्यात आली. केंद्रातील शिक्षकांचा सन्मान गुलाब पुष्प देवून करण्यात आला. यावेळी प्रविण देवरे यांनी गित सादर केले आला.
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण यांच्याद्वारा नियोजीत विषय ठेवण्यात आले. कलेतून शिक्षण घेवुया हा विषयी शिक्षक तुषार पाटील यांनी मार्गदर्शन केले.तर शिक्षक नरेंद्र गुरव यांनी व्हिडीओ दाखवून सादर केला. सखी सावित्री समिती गठीत यावर केंद्रप्रमुखांनी मार्गदर्शन केले. दिव्यांग मुलांचे मुल्यमापन यावर केंद्रप्रमुखांनी मार्गदर्शन प्रदीप शिंपी यांनी तर शैक्षणिक गरजा आधारीत यांनी प्रविण देवरे यांनी शाळैत राबविलेल्या विविध उपक्रम यशस्वी परिणाम या विषयी माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी आर.आर.देसले यांनी शिक्षणा कार्यत्पर राहण्याविषयी मार्गदर्शन केले व स्वतः कें्रदातील उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार केला. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी आमली शाळेचे मुख्याध्यापक पंकज तांबे, खापराचे मुख्याध्यापक शांताराम चव्हाण, आमलीबारीचे मुख्याध्यापक बबिता वळवी तिन्ही शाळांचे शिक्षक, शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्विनी मोरे यांनी केले. आभार सुनंदा भावसार यांनी मानले.









