Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह, मासेमारीसाठी धरणात गेलेल्या युवकाचा मृत्यू

team by team
April 9, 2022
in Uncategorized
0
अखेर तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह,  मासेमारीसाठी धरणात गेलेल्या युवकाचा मृत्यू

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील भरडू येथिल नागन मध्यम प्रकल्प धरणात मासेमारी करणारा चितवी येथील सुनिल हिरालाल गावित 35 वर्षीय तरुण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाल्याने दोन दिवसांपासून बेपत्ता झाला होता, स्थानिक पातळीवर शोधकार्य सुरू होते. पाण्यात बेपत्ता तरुणाचा तिसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आला.

नवापुर तालुक्यातील भरडु येथील नागन मध्यम प्रकल्प धरणात दि. 7 एप्रिल गुरुवारी दोन वाजेच्या सुमारास चितवी येथील सुनील हिरालाल गावित वय 35 हा मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी गेला असता सुनिल गावित हा युवक पाण्यात मासेमारी करण्यासाठी उतरला असता त्याच्या कमरेला मासेमारी पकडण्याची जाळी बांधलेली होती त्या अवस्थेत तो धरणाच्या पाण्यात उतरला त्याचे मित्र हे दुसर्‍या दिशेने पाण्यात उतरले. धरणाच्या किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये झाडेझुडपे व वेलीची जाळे असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेवाळ आहे. प्रत्यक्षदर्शी त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मासेमारी करतांना सुनिल गावित हा पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले त्यावेळी धरणाच्या पाण्यात स्थानिक गावकरी व त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता तो मिळून आला नाही. लागलीच विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. सदरच्या घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश येलवे, विश्वनाथ नाईक, लिनेश पाडवी यांच्यासह पोलीस अंमलदार यांनी दि. 7 एप्रिल सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये शेवाळ व वेली असल्यामुळे त्या ठिकाणी शोध कार्य घेण्यासाठी देखील मोठे जिकरीचे असल्याने रात्रीच्या वेळेस ते शक्य न झाल्याने त्यांनी पुन्हा दुसर्‍या दिवशी दि. 8 एप्रिल शुक्रवार रोजी पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केले परंतु त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सदरील घटनेत बेपत्ता युवकाचा शरीर आढळून आला नाही. मात्र तिसऱ्या दिवशी सकाळी सुनिल गावित या तरुणाचा मृतदेह पाण्यात वर आल्यावर स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनामार्फत त्याला बाहेर काढून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले. चितवी येथील मयत सुनिल गावित यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असून घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शरदचंद्र पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा नंदूरबार राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला निषेध

Next Post

जल, जंगल, जमीनच्या लढ्यात 50 वर्ष यशस्वी काम करणाऱ्या रामसिंग गावित यांच्या जाहीर नागरी सत्कार

Next Post
जल, जंगल, जमीनच्या लढ्यात  50 वर्ष यशस्वी काम करणाऱ्या रामसिंग गावित यांच्या जाहीर नागरी सत्कार

जल, जंगल, जमीनच्या लढ्यात 50 वर्ष यशस्वी काम करणाऱ्या रामसिंग गावित यांच्या जाहीर नागरी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add