नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा शहराचा विविध कामांसाठी विकास निधी मिळावा अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत तळोदा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी सकारात्मक चर्चा केली.

नगरविकास विभागाकडून तळोदा शहरात विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा म्हणून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे तळोदा शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी मागणी पत्र नंदुरबार जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार यांनी दिले.यावेळी शिवसेना तळोदा शहर प्रमुख जितेंद्र दुबे, माजी तालुका प्रमुख मधुकर मिस्त्री, विजय मराठे, आश्विन चौधरी आदी उपस्थित होते विकास कामांना निधी उपलब्ध करणे कामी सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.








