नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा येथील विवाहितेचा बुलेटसाठी छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील विवाहितेस मुलबाळ होत नाही तसेच बुलेट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत यासाठी मनोज रमण निकुंभे, रमण सेना निकुंभे, रेखाबाई रमण निकुंभे, जितेंद्र रमण निकुंभे व हर्षल जितेंद्र निकुंभे सर्व रा.शिरुड दिगर ता.शहादा यांनी तिचा छळकेला. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत शहादा पोलिस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रमण वळवी करीत आहेत.








