तळोदा l प्रतिनिधी
मोदलपाडा ता.तळोदा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण उद्या दि.८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता आदिवासी विकास मंत्री ना.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे.
मोदलपाडा येथे प्राथमिक आरोग्य कंेंद्राची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या दि.८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष ऍड.सीमा वळवी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ.हीना गावित, आ.अमरिशभाई पटेल, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.किशोर दराडे, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.शिरीषकुमार नाईक, आ.राजेश पाडवी, माजीमंत्री ऍड.पद्माकर वळवी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, सभापती अजित नाईक, निर्मला राऊत, रतन पाडवी, गणेश पराडके, माजी जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, तळोदा पं.स.सभापती यशवंत ठाकरे, उपसभापती लताबाई वळवी, पं.स.सदस्य सोनी पाडवी, सुमन वळवी, राहूल खाटीक आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी यांनी केले आहे.
दरम्यान, याचवेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबीराला नंदुरबार जिल्हा रूग्णालयातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी व तपासणी नंतर आवश्यक पुढील उपचार तसेच शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयात नंदुरबार येथे मोफत केली जाणार आहे. सर्व जि.प., पं.स.सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, कारभारी यांनी आपल्या गाव व परिसरातील जास्तीत जास्त गरजू रूग्णांना या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन माजी पालकमंत्री ऍड. पद्माकर वळवी यांनी केले आहे.