नंदूरबार l प्रतिनिधी
लायन्स फेमिना क्लब नंदुरबारतर्फे नंदूरबार शहरातील मीनाताई ठाकरे माॅ बेटी उद्यानामध्ये सेल्फी पॉइंट सुरू केला आहे. या सेल्फी पॉइंटच्या उद्घाटनासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमाताई वळवी व नंदुरबार शहराच्या नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी उपस्थित होत्या.
उद्यानातील दशा माता मंदिरात देवीचे पूजन केले. या कार्यक्रमात शहरातील अनेक महिला उपस्थित होत्या. सेल्फी पॉइंटचे उद्घाटन झाल्यानंतर जि. प. अध्यक्षा व नगराध्यक्षा यांच्या समवेत रंगपंचमीचा कार्यक्रम खूप उत्साहात साजरा केला. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षा ॲड.सीमाताई वळवी यांनी उद्यान अतिशय सुंदर असून हा माॅ बेटी उद्यानाच्या प्रकल्पाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे लायन्स फेमिना क्लबने उभारलेल्या सेल्फी पॉइंटचेही कौतुक केले. तसेच नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी यांनी देखील लायन्स फेमिना क्लबच्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. व सर्व महिलांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात लायन्स फेमिना क्लबच्या अध्यक्षा हिना रघुवंशी, क्लबच्या सेक्रेटरी सीमा मोडक,ट्रेझरर शितल चौधरी, डॉ. तेजल चौधरी, सुप्रिया कोतवाल, चेतना शहा, कांचन मुलानी, गायत्री पाटील या फेमिना क्लबच्या सदस्या तसेच समर्थ मंगलतीर्थ मधिल मोहिनी राजपूत
वासंती सैंदाणे, नयना सैंदाणे ,वैशाली बागुल उपस्थित होते.