अक्कलकुवा l प्रतिनिधी
खापर येथे शिवजयंती मिरवणूक साठी येणाऱ्या डीजेला अक्कलकुवा पोलीस विभागाकडून जप्त करून घेण्यात आले होते.त्यामुळे खापर गावकऱ्यांनी मिरवणुकीचा रथ रस्त्यावर उभा केला होता.उभा असलेला रथ पोलिसांनी रात्री १२.३० वाजेला.जागेवरून सरकवून कार्यक्रमाची समाप्ती केली.सदर घटनेमुळे अक्कलकुवा पोलीसांच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने खापर सह कोराई गावकऱ्यांनी गावबंद ठेवले.
सालाबादप्रमाणे या वर्षीही शिवजयंती उत्सवाची जल्लोषात तयारी करण्यात आली होती,परंतु जयंतीसाठी खापर येत असलेल्या डिजेला अक्कलकुवा येथे रस्त्यातंच पोलिसांनी अडवून घेतले.वाजण्याच्या अगोदरच पोलिसांनी डीजे मुजोरी करत ताब्यात घेतला. त्यामुळे खापर गावातील शिवभक्त प्रचंड प्रमाणात नाराज झाले, दशकांपासून चालत आलेल्या परंपरेला अक्कलकुवा पोलीस विभागाने खंड पाडल्याने पोलीस विभागाचा निषेध करण्यात आला होता
खापर येथे मिरवणूक काढण्या आधीच डीजे जप्त करण्यात आला,पोलीसांच्या मुजोरी कारभारामुळे खापर गावातील संतप्त गावकऱ्यांनी मिरवणुकीचा रथ वाटेवरच सोडला होता,व आज मंगळवार रोजी पोलीस विभागाच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने खापरसह कोराई गावबंद ठेवण्यात आले होते.यानंतर आंबिका माता मंदिर येथे ठेवण्यात आलेल्या सर्व पक्षीय नेते,संघटना,व्यापारी तसेच गावकऱ्यांच्या बैठकीत जर निर्दोष असलेल्या शिवभक्त युवावर विनाकारण गुन्हे दाखल झाल्यास तर सर्वानुमते बेमुदत गावबंद ठेवण्यात येईल असे ठरवण्यात आले.
सदर झालेल्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधले.
यावेळी खापर पोलीस दुरक्षेत्र येथे पोलीस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत झालेल्या घटने संदर्भात चर्चा झाली.त्यात सर्वपक्षीय नेते,लोकप्रतिनिधी यांच्याकडून उत्सव समितीच्या सदस्यांवर कोणतीही कार्यवाही तथा गुन्हे दाखल करू नये अशी सूचना वजा विनंती करण्यात आली.यासंदर्भात सकारात्मक चर्चा घडवून आली.याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत, पोलीस निरीक्षक आय.एन.पठाण,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर,पोलीस हवालदार मोहन शिरसाठ व खापर उपसरपंच विनोद कामे,ललित जाट,लक्ष्मण वाडीले, योगेश सोनार,किरण पाडवी,देविदास वसावे, अजय पटेल,मुन्ना अग्रवाल आदी ग्रामस्थांनसह पत्रकार उपस्थित होते.








