नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात लहुजी शक्ती सेना तथा मातंग समाज नंदुरबारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले .यावेळी मातंग समाज उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. दिनेश खरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पानपाटील, भिका भामरे, भावेश पगारे, शहर कार्याध्यक्ष रोहित पाचोरने, विनोद पवार, युवा जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बेहडे, संघटक सुरेश सोनवणे, सुनील लांडगे, गजानन पाचोरने, शिंदे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.








