म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मलोणी येथील एस.ए.मिशन खाजगी प्राथमिक मराठी शाळेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना सर्व महिला शिक्षिका व शिक्षकांद्वारे पुष्पहार घालून व पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज व सहकारी शिक्षक व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी काही विद्यार्थिनींनी थोर महिलांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रम सादर केले.शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त सप्ताह साजरा केला जात असून आज रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. संदिप पाटील यांनी थोर महिलांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्व महिला शिक्षिकांचा मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज यांनी पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले.महिला पालकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उषा जाधव, मंगला पाटील, भारती शेवाळे, कुणाल सोमवंशी सोनाली पाकळे नितिन गलराह यांनी परिश्रम घेतले.