नंदूरबार l प्रतिनिधी
श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता.नंदूरबार व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार रोजी “आजादी का अमृत महोत्सव” निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला रांगोळीचे परीक्षक सामाजिक वनीकरणाच्या वनरक्षक सविता धनराज धनगर व वनपाल श्रीमती आर. एम. मराठे यांनी केले. या स्पर्धेत मोठ्या गटात इयत्ता दहावीचा गट प्रथम, इयत्ता नववी ब च्या विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक, इयत्ता आठवी ब च्या विद्यार्थिनी तृतीय क्रमांक पटकाविला तर लहान गटात इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक, इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी तृतीय क्रमांक पटकाविला.
या कार्यक्रमास विद्यालयाच्या प्राचार्य सौ विद्या चव्हाण, पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.