नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद नंदुरबार स्थायी समिती बैठकीत शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ.राहुल चौधरी यांची बदली करण्यात यावी.असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी डॉ.युनुस पठाण यांच्याकडे चार्ज देण्यात आला होता. कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी श्री.पठाण यांनी शिक्षण विभाग प्राथमिक कार्यालयात झिरो पेंन्डनशी फाईल निकाली काढण्यासाठी उत्तम कार्य केले आहे.शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्न निकाली काढले आहेत.परंतु जळगाव येथील गटशिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा संघटक गणेश पाटील यांच्या हस्ते नुतन प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.यावेळी प्रलंबित प्रश्न संदर्भात चर्चा करण्यात आली आहे.
तीन वर्षानंतर शिक्षण विभागाला नियमित शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ मधील शिक्षणाधिकारी व तत्सम पदावर राज्यातील ५२ जणांच्या पदोन्नती करण्यात आल्या आहेत. यात नंदूरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी जळगाव येथील गटशिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागाला नियमित शिक्षणाधिकारी नसल्याने अवघ्या तीन वर्षात सहा वेळा पदभार बदलण्यात आला. त्यामुळे तीन वर्षानंतर शिक्षण विभागाला नियमित शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. याआधी श्री.सतिश चौधरी यांनी नवापूर येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सन १९९८ ते २००६ या कालावधीत अधिव्याख्याता म्हणून काम पाहीले आहे. त्यामुळे नंदूरबार जिल्ह्यातील शिक्षणाबाबत, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.यावेळी प्रशासन अधिकारी सुभाष मारनर उपस्थित होते. सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्यात येतील असेही आश्वासन प्रहार शिक्षक संघटनेस दिले आहे.त्यामुळे शिक्षण विभागालाही त्याचा लाभ होईल. प्राथमिक शिक्षकांची प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा वाडी-वस्ती पाड्यावरील शिक्षक बांधवांना अपेक्षा आहे.