नंदुरबार | प्रतिनिधी
बेकादेशीररित्या गुप्ती बाळगतांना मिळून आलेल्या एका युवकाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून स्टिलची गुप्ती हस्तगत केली असून म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील अजय राजु पावरा हा म्हसावद ते तोणमाळ रस्तयावर फिरतांना मिळून आला. त्याच्याकडून स्टिलची गुप्ती मिळून आली. त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोशि शैलेंद्र राजपूत यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय राजु पावरा याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.