Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सुझलॉनच्या ब्लेडची वाहतूक करणारे सहा वाहने पकडली

team by team
February 11, 2022
in क्राईम
0
नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सुझलॉनच्या ब्लेडची वाहतूक करणारे सहा वाहने पकडली

नंदुरबार l प्रतिनिधी
सुझलॉनच्या ब्लेडची वाहतूक करणारे वाहने कर चुकविण्यासाठी रात्रीतून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सुमारे ६० मीटर लांबी असलेले ब्लेडची वाहतूक करण्यासाठी डीओडीएची परवानगी आवश्यक असतांना सदरची परवानगी घेतल्याचा परवाना सोबत न बाळगल्याने नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सहा वाहने अडविली आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळसह परिसरात थेट साक्री तालुक्यापर्यंत सुझलॉन कंपनीचे टॉवर उभारण्यात आले आहेत. सदर टॉवरसाठी आवश्यक असणाऱ्या ब्लेडची लांबी सुमारे ५५ ते ६० मीटर इतकी असते. बऱ्याचदा रस्ता अरुंद असल्याने सदर ब्लेडची वाहतूक करणाऱ्या ट्रालाला अनेकदा अडचणी येतात. यामुळे झाडे तोडून नुकसान देखील करण्यात येते. असे असले तरी सुझलॉनच्या ब्लेडची वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या अंधारातच वाहतूक करत असल्याचे दिसून येते. ब्लेडची वाहतूक करण्यासाठी परिवहन विभागाकडून डीओडीएची परवानगी आवश्यक असते. यासाठी कर देखील भरावा लागतो. मात्र सुझलॉनकडून सदरचा कर चुकविण्यासाठी परवानगी न घेताच अनेकदा वाहतूक होत असल्याचे दिसून येते. गेल्या दोन दिवसांपूर्वी दि.१० फेब्रुवारीच्या रात्री डीओडीएची परवानगी नसल्याचे निदर्शनास आल्याने नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सहा वाहने अडविण्यात आली आहेत. परिवहन कार्यालयातर्फे तपासणी केली असता वाहनधारकांकडे वाहतूकीची परवानगी आढळून आली नाही. मात्र काल सदरची परवानगी घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. आरटीओकडून वाहनांची तपासणी करण्यात आली
सुझलॉनच्या ब्लेडची वाहतूक करतांना वळण रस्त्यावर वाहनाच्या रस्त्यात येणारी झाडे तोडून नुकसान करण्यात येते. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे यापूर्वी रस्ता अडविल्याने अशा वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच रस्त्याचे नुकसान केल्याप्रकरणी देखील कारवाई करण्यात येते. यामुळे सदरची कारवाई टाळण्यासाठी व कर चुकविण्यासाठी सुझलॉनच्या ब्लेडची वाहतूक रात्रीतून होत असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात येते. यामुळे शासनाची फसवणूक करणाऱ्या अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वृद्धाचे ५० हजार चोरणारा ‘पुष्पा’ अखेर पकडला ! एस.पी. नी दिलेला शब्द खरा केला, नंदुरबार पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

Next Post

अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या ५६ व्या अधिवेशनास ध्वजारोहण करून प्रारंभ

Next Post
अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या ५६ व्या  अधिवेशनास ध्वजारोहण करून प्रारंभ

अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या ५६ व्या अधिवेशनास ध्वजारोहण करून प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add