नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील पाण्याच्या टाकीजवळ ११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत राहणाऱ्या
नाजिम रहिम बागवान (वय ३२)हा शहादा ज्वेलर्सच्या दुकानात गहाण ठेवलेले सोने सोडविण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला पकडून तपासणी केली असता त्याच्या ताब्यात १०० रुपयांच्या १११ बनावट नोटा असा एकूण ११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्याला बनावट नोटा असल्याची माहिती असतानाही त्याने बनावट नोटा बाळगल्या. याप्रकरणी पोना विकास कापूरे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात नाजिम रहिम बागवान रा.गरीब नवाज कॉलनी,शहादा यांच्या विरुद्ध भादवी कलम 489 (ब), 489 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत करीत आहेत.










