Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन

team by team
July 18, 2021
in राज्य
0
तळोदा विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन
तळोदा | प्रतिनिधी
वारी विरोध, वारकर्‍यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकाचा अपमान व जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजर कैदेचा निषेध भजनी आंदोलनाबाबत विश्व हिंदू परिषद नंदुरबार यांच्या वतीने तळोदा तहसिलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले.
     या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारचा वारी विरोध म्हणून सरकारने अस्मानी संकटाचा फायदा घेत पोलिस प्रशासनाच्या बाळाने वारकर्‍यांवर जाणीवपूर्वक केलेले सुल्तानी अत्याचार आहेत. महाराष्ट्राचे जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजरकैद हा त्याचाच एक प्रकार आहे. भर रस्त्यात वारकर्‍यांचे पारंपारिक गणवेश उतरवायला लावणे. हिंदुत्वाचे व महाराष्ट्राचे संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भागवत धर्मीय पताकाची अवहेलना करणे. हरी भक्त पारायण निरपराध संताना अटकवणे त्यांना अपराध्याची वागणूक देणे. जागोजागी वारकर्‍यांची अडवणूक करणे त्यांच्यावर प्रशासनिक बडगा दाखवून अत्याचार करणे हे अत्यंत निषेधार्थ आहे. संविधांनाने नागरिकांना उपासना करण्याचा अधिकार व स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. त्यांना कोणीही धक्का लावू शकत नाही. म्हणून विश्व परिषद व समस्त वारकरी संप्रदायाद्वारे भजनी आंदोलन पुकारण्यात येत आहे.
           विश्व परिषद व समस्त वारकरी संप्रदाय यांच्या मागण्या : जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.बंडातात्या कराडकर  यांना व जागोजागी अडवणूक केलेल्या वारकर्‍यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे. त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावे. आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठांमध्ये चालणार चातुरर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तने प्रवचने, दर्शन यावरील प्रतिबंध दूर करावे जसे कार्यालयात बस प्रवास, थिएटर किंवा हाँटेल ५० टक्के उपस्थितीत मान्यता दिली आहे तशी या अनुस्थानांना अनुमती द्यावी. मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांची तात्काळ माफी मागितली पाहिजे. या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात सरकारी पूजेसाठी येऊ नये. राज्य सरकारने वारकर्‍यांच्या मागण्यांच्या निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्र व्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. या आंदोलना नंतर ही साधू संताची अवहेलना न थांबल्यास वारकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरेल याची गांभिर्याने नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे.
     या मागणीच्या निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे, जिल्हा मठमंदिर प्रमुख महेश टोपले, प्रखंड अध्यक्ष राजाराम राणे, प्रखंड कार्याध्यक्ष डॉ.शांतीलाल पिंपरे, प्रखंड मंत्री दिपक चौधरी, शहरमंत्री पवनकुमार शेलकर, शहर उपाध्यक्ष भूपेंद्र बारी, गोरक्ष प्रमुख संजय जावरे आदींच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे गोठ्याला आग, २ वासरू जळून खाक, २ लाख ७५ हजाराचे शेतीपयोगी साहित्य जळाले

Next Post

तळोदा येथे कत्तलीच्या इराद्याने कोंडून ठेवलेली सात लाखाचे ३६ जनावरे घेतली ताब्यात, दोघांविरूध्द गुन्हा

Next Post

तळोदा येथे कत्तलीच्या इराद्याने कोंडून ठेवलेली सात लाखाचे ३६ जनावरे घेतली ताब्यात, दोघांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add