Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत उत्कृष्ट दर्जाच्या तांदळाचेच वितरण

team by team
July 13, 2021
in राज्य
0

नंदुरबार ! प्रतिनिधी

अन्ननागरी पुरवठा विभागामार्फत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यात उत्कृष्ट दर्जा असलेल्या तांदळाचे वितरण केले जात आहे.राज्यात निकॄष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तसेच खडे अथवा कचरा मिश्रीत असलेला तांदूळ वाटप झाल्याच्या कोणत्याही तक्रारी या विभागाला मिळालेल्या नाहीत, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत  प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

 

            विकेंद्रित धान खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून त्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीने धानाची खरेदी केली जाते. या धानाची भरडाई करून सरासरी गुणवत्ता दर्जाचा (FAQ) तांदूळ भरडाई करणाऱ्या मीलरकडून तपासणी करून स्वीकारला जातो. हा तांदूळ सद्यस्थितीत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत नागपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाटप केला जात आहे. निश्चित केलेल्या गुणवत्तेनुसार जर मिलरने तांदूळ दिला नाही तर तो ताबडतोब बदलून घेतला जातो.

            कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्याना निकॄष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तांदूळ वाटप केला जाणार नाही याची यंत्रणेकडून दक्षता घेण्यात येते. तसेच नजिकच्या काळात नागपूर जिल्ह्यातून अथवा राज्यातील अन्य जिल्ह्यांतून निकॄष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तसेच खडे अथवा कचरा मिश्रीत असलेला तांदूळ वाटप झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. सद्यस्थितीत अनेक जिल्ह्यांसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून तांदळाची उचल केली जात नाही तसेच मिलरकडून तांदूळ घेताना गुणवत्ता तपासणी करून लाभार्थ्यांना वाटपासाठी तांदूळ उपलब्ध केला जात आहे. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विहित केलेल्या परिमाणात तांदळाचे वाटप केले जात आहे. तांदळाचा काळाबाजार केल्याची बाबदेखील नजिकच्या काळात निदर्शनास आलेली नाही.

   नवी मुंबईमध्ये जुलै व ऑगस्ट, 2020 मध्ये  पनवेल तालुक्यात अवैध साठवणूक केलेला तांदूळ शासन जमा करण्यात आला होता.  हा तांदूळ महाराष्ट्र राज्यातील नसून कर्नाटक राज्याच्या लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील असल्याचे व तो इतर देशात निर्यातीसाठी आणला असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. नियमानुसार पनवेल तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांमार्फत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना या तांदळाचे वाटप करण्यात आले आहे, असे एका पत्रकाद्वारे अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रसिद्धीस दिले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जळगाव-भुसावळ रेल्वे मार्गाच्या तांत्रिक कामामुळे ३० गाड्या रद्द

Next Post

रोटरी क्लब नंदनगरीतर्फे खेळसाहित्यासह मास्क वाटप

Next Post
रोटरी क्लब नंदनगरीतर्फे खेळसाहित्यासह मास्क वाटप

रोटरी क्लब नंदनगरीतर्फे खेळसाहित्यासह मास्क वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add