नंदुरबार ! प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील मौलीपाडा येथे आजीला मिळालेले दोन हजार रुपये देण्यास नकार देणाऱ्या भावास व वहिणीला भावाने काठीने मारहाण केल्याप्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील मौलीपाडा येथील उमेश छगन वसावे व राहूल छगन वसावे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. उमेश वसावे यांच्याकडे आजी राहते. आजीला दोन हजार रुपये मिळाले असून सदर दोन हजार रुपये राहूल वसावे याने उमेशकडून मागितले. मात्र उमेशने पैसे देण्यास नकार दिल्याने राहूल वसावे याने काठीने उमेशचे डोके, नाक व हातावर मारुन दुखापत केली. वाद मिटविण्यासाठी गेलेल्या उमेश यांच्या पत्नी रविनाबाई यांनाही मारहाण केली. याबाबत उमेश वसावे यांच्या फिर्यादीवरुन संशयित राहूल वसावे याच्याविरोधात विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.सुरेश मोरे करीत आहेत.