नंदुरबार l प्रतिनिधी
नवनिर्माण संस्था नंदुरबार व आरोग्यवर्धिनी केंद्र नांदरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने भिलाईपाडा येथील राजीव गांधी भवनात आरोग्य लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन.पाटील होते. प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते रणजित राजपूत व ग्रामसेवक बी.एस.अहिरे,मणीलाल गायकवाड उपसरपंच दिलीप वळवी होते. सरस्वती पूजनाने आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले.त्यानंतर गावातील एकही डोस न घेतलेल्या लाभार्थ्यांना विनंती करून बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांना कोव्हीशिल्ड लस देण्यात आली.ज्या नागरिकांनी आधी लस घेतली होती त्यांना लसी चे प्रमाणपत्र देण्यात आले. गावातील नागरिकांची नेत्रतपासणी, करून गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले.तसेच डायबिटीस व बीपीचा त्रास असलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले गावातील अनेक नागरिकांना,सर्दी अंगदुखी तसेच डोकेदुखी त्रास असलेल्या सर्व नागरिकांना मोफत औषधोपचार करण्यात आले.आरोग्य शिबिरासाठी डॉ तमायचेकर व टीम,आय सीटीसी लॅब यांनी जबाबदारी पार पाडली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले.तसेच गावात घरोघर जाऊन लसीकरण न झालेल्या नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे डॉ.संदीप काकूंस्ते,कुळकर्णी सिस्टर पिंगळे सिस्टर यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी अध्यक्ष एस. एन.पाटील यांनी नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी व शाळेचे मुख्याध्यापक संतोष नांद्रे यांनी या आरोग्य व लसीकरण शिबिराचे आयोजन केल्यामुळे कौतुक केले.आजच्या काळात अशा शिबिरांची आवश्यकता असून हे पुंन्याचे काम आहे असे सांगून लसीकरणाचे महत्व तसेच कोरोना आजाराविषयी काळजी कशी घ्यावी याबाबतीत माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नांद्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रवी गोसावी यांनी केले. यावेळी गावातील 100 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच कोव्हिशिल्ड लसीचे लसीकरण पहिला डोस व दुसरा डोस मिळवून 25 लाभार्थ्यांनी लस घेतली. कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका आशाताई यांची उपस्थिती होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षिका वृषाली नांद्रे गावातील संजय वळवी, मुकेश वळवी, रमेश सोनवणे ,संजय सोनवणे, कोरसु गावित उखड्या मोरे प्रवीण वळवी यांनी मेहनत घेतली प्रकल्प व्यवस्थापक संजय वळवी समुपदेशक भूमिका,भगत मनीषा पाडवी ,कौशल्य चौरे पूजा शर्मा दिलीप पावरा शोभा मराठे आदींनी परिश्रम घेतले.








