नंदुरबार l प्रतिनिधी
प्रशासकीय सेवेतील भरीव कार्याची दखल घेऊन येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मच्छीन्द्र कदम यांना समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल श्री. भगतसिंह कोशारी यांचे हस्ते राजभवन त्यांना गौरविण्यात आले. तसेच महात्मा गांधी ग्लोबल पीस फौंडेशन,ओरिसातर्फे त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. श्री.कदम यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे शैक्षणिक वर्तुळातून अभिनंदन होते आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या माध्यमिक शैक्षणिक शिक्षणाधिकारी पदाच्या जबाबदारीतून श्री मच्छिंद्र कदम यांनी भरीव कार्य करत विविध समस्यांना सोडविण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट प्रशासकीय नियोजन केले आहे. उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पार पाडण्याचे त्यांच्यात असलेले कसब खूपच स्तूस्त्य आहे. कोरोणाचा उद्रेक उसळला असताना त्यांनी शैक्षणिक पातळीवर एक जबाबदार अधिकारी म्हणून दिलेली सेवा ही अधोरेखीत करण्यासारखी होती. या त्यांच्या व्यासंगी व समर्पित कार्य भावनेची दखल घेत त्यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट समाज सेवा रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा शासकीय कार्यक्रम मुंबई येथील राजभवनात नुकताच संपन्न झाला. राज्यपाल श्री भगतसिंग कोष्यारी यांनी त्यांच्या शुभहस्ते पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या व्यापक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महात्मा गांधी पीस फाउंडेशनने त्यांना विद्यावाचस्पतीची मानद डॉक्टरेट प्रदान केली.दोन सन्मान नंदुरबार जिल्ह्यातील एकाच अधिकाऱ्याला एकाच वेळी मिळाल्याने त्यांच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्याचे नाव उज्वल झाले आहे. त्यांना त्यांच्या या यशाबद्दल अधिकारी व कर्मचारी वर्तुळातून अभिनंदन होते आहे.
शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम यांच्या कर्तबगारीची दखल घेऊन त्यांच्याकडे विस्ताराने मोठ्या असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी पदाची सूत्रेही शिक्षण मंत्रालयाने सोपविली आहेत.








