नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे देवमोगरा माता मंदिर नवापूर चौफुली मंदिराच्या परिसरात कडुलिंब,वड,पिंपळ,शिसव,गुलमोहरांचे वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण करण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित,सचिव सुनील गावित ,कार्याध्यक्ष विश्वास देसाई ,कोषाध्यक्ष निदेश वळवी ,जगदीश नाईक आदी परिश्रम घेतले.कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये वाढदिवस साजरा करताना मास्क वाटप,वृक्षारोपण,रक्तदान शिबीर सामाजिक उपक्रमांनी साजरा केला असून हे समाजासाठी आदर्शवाद व स्तृत्य असे आहे. वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. वृक्षारोपण करणे ही एक नीतिमत्ता संस्कृती आहे.झाडे लावा,झाडे जगवा हा सामाजिक संदेश देण्यात आला.पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड करून वृक्षांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.सदर उपक्रम राबविण्याचे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये झाडे लावून बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.असे वक्तव्य जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी जिल्ह्यातील शिक्षक बांधवांना झाडे लावा झाडे जगवण्याचे आवाहन केले आहे.