नंदुरबार| प्रतिनिधी
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियमानुसार रिक्त नंदुरबार व शहादा पंचायत समितीचे उपसभापती पदासाठी आज दि. २४ ऑक्टोंबर निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली.दुपारी १ वाजेला पर्यंत अर्ज दाखल करण्यात आले यात कॉग्रेसचे कमलेश महाले यांनी दोन तर भाजपातर्फे छाया जितेंद्र पवार यांनी नामाकंन दाखल केले. त्यानंतर सर्वसाधारण सभते हात उंचावुन मतदान घेण्यात आले. यात आघाडीचे कॉग्रेसचे कमलेश दिलीप महाले यांना ११ मते मिळाली तर भाजपाच्या छाया जितेंद्र पवार यांना ९ मते मिळाल्याने कॉग्रेसचे कमलेश महाले २ मतांनी विजयी झाले.
या सभेसाठी पिठासन अधिकारी म्हणुन नंदुरबारचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात होते.कॉग्रेसचे कमलेश महाले यांच्या अर्जावर सुचक म्हणुन संतोष साबळे व प्रल्हाद राठोड यांच्या स्वाक्षर्या होत्या. अर्ज दाखल करतांना बी.के.पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र गिरासे आदी उपस्थीत होते,तर भाजपातर्फे छाया जितेंद्र पवार यांनी नामाकंन दाखल केले.त्यांच्या अर्जावर सुचक म्हणुन सिमा जमदाळे यांची स्वाक्षरी होती .अर्ज दाखल करतांना प.स.सभापती प्रकाश गावीत उपस्थित होते.नंदुरबार पंचायत समितीच्या पाच रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ५ पैकी ४ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला होता.यात भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले होती. या निवडणुकीत भाजपाला २ जागांचा फटका बसला असून शिवसेनेच्या २ जागा वाढल्या होत्या. सद्यस्थितीत पंचायत समितीत भाजपाचे ९, शिवसेनेचे ८ तर कॉंग्रेसचे ३ सदस्य आहेत.
दुपारी पंचायत समितीच्या स्व. सौ.हेमलताताई वळवी सभागृहात दुपारी ३ वाजेला झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.यात कोणीही माघारी घेतली नाही.त्यामुळे हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. यात आघाडीतर्फे असलेले कॉग्रेसचे कमलेश दिलीप महाले यांना ११ मते मिळाली तर भाजपाच्या छाया जितेंद्र पवार यांना ९ मते मिळाल्याने कॉग्रेसचे कमलेश महाले २ मतांनी विजयी झाले. पिठासन अधिकारी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.यानंतर प.स.सभापती प्रकाश गावीत यांनी पुश्पगुच्छ देवुन कमलेश महाले यांचा सत्कार केला.यावेळी समर्थकांनी एकच जल्लोष केला.








