नंदुरबार l प्रतिनिधी-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराईच्या संघाने १४ वर्षे वयोगट व १७ वर्षे वयोगटात विजय संपादन केल्याने त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
१४ वर्षे आतील संघात चिराग अंबालाल पावरा, प्रेम विजय पावरा, कार्तिक लक्ष्मण पावरा, अमीर संजय पावरा, पियुष रमेश पावरा, हे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्याचे नेतृत्व करतील.
तर १७ वर्षेआतील संघात सचिन सुभाष पावरा, रुपेश सुभाष पावरा, रोहन भुरसिंग पावरा, प्रतीक राजेंद्र पावरा, ऋषी कृष्णा पावरा हे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्याचे नेतृत्व करतील.
सदर विभागीय स्पर्धा ह्या मोदकेश्वर टेनिस अकॅडमी नाशिक व तेजस टेनिस अकॅडमी नाशिक येथे संपन्न होणार आहेत.
जिल्हास्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल तसेच विभागीय स्तरावरील निवडीबाबत सर्व खेळाडू व प्रशिक्षक उमेश राजपूत यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित सचिव ऋषिका गावित,डॉ. विभूती गावित, प्राचार्य शरद पाटील यांनी अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.







