नंदुरबार| प्रतिनिधी
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियमानुसार रिक्त नंदुरबार व शहादा पंचायत समितीचे उपसभापती पदासाठी आज दि. २४ ऑक्टोंबर निवडणुक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.दुपारी १ वाजपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले यात आघाडीतर्फे कॉग्रेसचे कमलेश महाले यांनी दोन तर भाजपातर्फे छाया जितेंद्र पवार यांनी नामाकंन दाखल केले.सर्वसाधारण सभेनंतर उपसभापतीचे निवड होणार आहे.

यासाठी दि.२४ ऑक्टोंबर २०२१ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी पिठासन अधिकारी म्हणुन नंदुरबारचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात आहेत.कॉग्रेसचे कमलेश महाले यांच्या अर्जावर सुचक म्हणुन संतोष साबळे व प्रल्हाद राठोड यांच्या स्वाक्षर्या आहेत. अर्ज दाखल करतांना बी.के.पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र गिरासे आदी उपस्थीत होते,तर भाजपातर्फे छाया जितेंद्र पवार यांनी नामाकंन दाखल केले.त्यांच्या अर्जावर सुचक म्हणुन सिमा जमदाळे यांची स्वाक्षरी आहे.अर्ज दाखल करतांना प.स.सभापती प्रकाश गावीत उपसथीत होते.नंदुरबार पंचायत समितीच्या पाच रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ५ पैकी ४ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला होता.यात भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपाला २ जागांचा फटका बसला असून शिवसेनेच्या २ जागा वाढल्या आहेत. सद्यस्थितीत पंचायत समितीत भाजपाचे ९, शिवसेनेचे ८ तर कॉंग्रेसचे ३ सदस्य आहेत. त्यामुळे भनंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतर होवून आघाडीचा उपसभापती निवडण्याची शक्यता आहे.








