नंदुरबार | प्रतिनिधी
जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम महाविद्यालयातील परिसर रासेयो स्वयंसेवकांनी स्वच्छ केला. स्वच्छ भारत निरोगी भारत असा संदेश यातून देण्यात आला. श्रमदानासाठी एकूण पन्नास स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. यानंतर जिल्हा विधी प्रधिकरण व महिला बाल विकास कार्यालय यांच्यामार्फत रासेयो स्वयंसेवकांसाठी महिलांचे कायदे व बाल संरक्षण कायदे या विषयावर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते महिला बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ यांनी बाल मजुरी, बालविवाह, बालकांचे कायदे, बालकांचे अधिकार, बाल संरक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.एम.जे.रघुवंशी हे होते.त्यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे अभिनंदन व कौतुक केले. प्रमुख अतिथी उपप्राचार्य एन.जे.सोमाणी यांची उपस्थिती लाभली्. सदर कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन प्राचार्य डॉ. व्ही.एस.श्रीवास्तव व संस्थेचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.मनोज शेवाळे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.एन.आर.कोळपकर यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभाग, एन.सी.सी. युनिट, रासेयो विभाग, प्रा.एम.एम.कुवर,प्रा.के.सी.साठे, प्रा.सी.के.गिरासे, डॉ.डी.डी.गावित व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.