Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

team by team
April 1, 2026
in राजकीय
0
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील महाराणा प्रताप पुतळा, खोडाई माता मंदिर परिसर आणि जगताप वाडी चौक आता हायमस्ट लाईटच्या प्रकाशाने झगमगून गेले आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ३ हायमस्ट लाईट्सचे लोकार्पण शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.हायमस्ट लाईटच्या प्रकाशाने शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

नगरपालिकेमार्फत शहरात साडेबारा मीटर उंचीचे आणि २०० वॅट क्षमतेचे ३ हायमस्ट लाईट बसविण्यात आले आहेत. या कामाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्विच दाबून केले.शहरातील महाराणा प्रताप पुतळा, खोडाई माता मंदिर परिसर आणि जगताप वाडी चौक प्रकाश व्यवस्थेमुळे झगमगून गेली असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची भर पडली आहे.

या उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती देवेंद्र जैन, आरोग्य सभापती प्रीतम ढंडोरे, बाजार समिती सभापती दीपक मराठे, नगरसेवक रविंद्र पवार, अमित परदेशी, गौरव चौधरी, मोहितसिंग राजपूत, भरत चौधरी, कमल ठाकूर, अतुल पाटील, आकाश अहिरे यांसह मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

गारपीटग्रस्त शेतीची डॉ.हिना गावित यांनी केली पाहणी

Next Post

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Next Post
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add