Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

team by team
February 2, 2026
in राजकीय
0
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी

पालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता धारकांना शासनाने २ टक्के शास्ती लावलेली आहे. थकीत मालमत्ता करावरील ५० टक्के शास्तीवरील रक्कम अभय योजनेतून माफ व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नगरपरिषदेकडून प्रस्ताव सादर करून त्यांच्याकडून मान्यता घेतली जाईल अशी माहिती रविवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. अभय योजनेचा लाभ घेऊन कराचा भरणा करण्याचे यांनी केले आहे.

नंदुरबार नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्तांच्या थकीत करांवर शासनाने २ टक्के शास्ती लावलेली आहे. याबाबत रविवारी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, २ टक्के शास्तीतून ५० टक्के शास्ती माफ करण्याच्या अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे तर ५० टक्के रक्कम माफ करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. मालमत्ता धारकांनी ५० टक्के शास्तीची रक्कम भरूनच कराचा भरणा करायचा आहे. मालमत्ता धारकांना ५० टक्के शास्ती माफ व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नगरपरिषदेकडून प्रस्ताव सादर करून त्यांच्याकडून मान्यता घेतली जाईल.

यासाठी शहरातील नागरिकांनी अभय योजनेचा फॉर्म नगरपालिका कार्यालयात भरून द्यावयाच्या आहे. कार्यालयातच 50 टक्के शास्तीची रक्कम भरण्यातील येईल. शास्तीची 50 टक्के रक्कम शासनाने माफ केली तर मालमत्ता धारकांनी भरलेल्या रकमेचे समायोजन करून भरलेल्या करात जमा होईल आणि पुढील वर्षात मालमत्ता कर कमी घेण्यात येईल. या आर्थिक वर्षात अभय योजनेच्या लाभ घेतला तरच फायदा होईल. ३१ मार्च पूर्वी शास्तीची रक्कम भरावी लागेल अन्यथा भविष्यात २ टक्के शास्तीची रक्कम भरावी लागेल.

अशी आहे अभय योजना

नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्तांच्या थकीत करांवर २ टक्के दंड लावण्याची तरतूद आहे. यामुळे मालमत्ता धारकाच्या एकूण थकबाकीमध्ये वाढ होऊन दंडाची ही रक्कम अनेकदा मूळ कराच्या रकमेपेक्षा अधिक होते. मूळ कराच्या रकमेपेक्षा दंडाची रक्कम अधिक झाल्याने मालमत्ताधारक कर भरण्यास टाळाटाळ करतात. यावर उपाय म्हणून थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करून अभय योजना लागू आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

Next Post

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

Next Post
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add