नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी दुर्घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या चटका लावणार्यसा घटनेनंतर तालुक्यातील रनाळे गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
रनाळे गावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे सर्व दुकान, बाजार पेठ, व्यापार बंद ठेवून गावात दुःख व्यक्त करुन सर्व गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी बबलू कदमबाडे, नारायण पाटील, डॉ.जगदीश चोधरी, हारुण पठाण, पंकज जाधव, बाबू खाटीक, निलेश ठाकरे आदी कार्यकत्यांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.







