खबरदार ! शिवसैनिकांवर सूडबुद्धीने वागाल तर : गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या गंभीर इशारा
नंदुरबार l प्रतिनिधी-
शिवसेना पक्ष वाढीसाठी शिवसैनिक जे कार्य करत आहेत त्यांच्या सोबत आपण खंबीरपणे उभे आहोत. कुणालाही घाबरायचं कारण नाही. जिल्ह्यात घडलेल्या घटनांविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कुठल्याही शिवसैनिकावर कुणी सूडबुद्धीने वागत असेल तर माझ्याशिवाय कोणीही वाईट नाही. असा गंभीर इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.
शिवसेना भवन,आमदार कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मी ज्या ठिकाणी दौरे करत असतो त्या शहरातील शिवसेना कार्यालयाच्या भेटी शिवाय दौरा पूर्ण होत नाही. शिवसैनिकांच्या भेटीगाठीशिवाय कुठलाच कार्यक्रम करत नसतो. शिवसैनिकांच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहण्याची पूर्ण तयारी शिवसैनिक म्हणून आपली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावरील पंचायत समिती आणि प्रांत कार्यालयातील कामकाजाच्या आढावा घेण्यात येईल.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी पक्षाचा आढावा सादर केला. प्रसंगी आ. आमश्या पाडवी, नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,धडगाव,अक्कलकुवा विभागाचे जिल्हाप्रमुख गणेश पराडके,शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पराडके,माजी जि.प अध्यक्ष वकील पाटील,माजी सभापती विक्रमसिंह वळवी,माजी जि.प सदस्य विजय पराडके,माजी सभापती विक्रमसिंह वळवी, माजी जि.प अध्यक्ष रमेश गावित,युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील 15 दिवसांपूर्वी पालिका उपनगराध्यक्ष निवडीनंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वादानंतर माजी आ.शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यातील घटनेच्या विषयावर हात घालत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गंभीर इशारा दिला. शिवसैनिकावर कुणी सूडबुद्धीने वागत असेल तर माझ्याशिवाय कोणीही वाईट नाही.घडलेल्या घटनांविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.








