नंदुरबार l प्रतिनिधी-
शासन आणि प्रशासन ही दोन्ही घटक एकत्र येऊन काम केल्यास जिल्ह्याची प्रगती होईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन योगेश ज्योती रामदास कदम यांनी केले.
ते पोलीस कवायत मैदानावर 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी खासदार ॲड गोवाल पाडवी, विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, विधानसभा आमदार राजेश पाडवी, आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, श्याम वाडकर, ज्ञानेश्वर पाटील, कल्पना ठुबे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक आशित कांबळे,
जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहा सराफ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अंकुश पालवे, विभागीय वन अधिकारी डॉ. प्रकाश गुजर, व विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख-कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने केलेले प्रयत्न यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. जिल्ह्यात ‘घरकुल’ सारख्या अनेक योजना दुर्गम भागामध्ये यशस्वीरीत्या राबवल्या जात आहेत. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी ‘उमेद मॉल’ ही योजना 12 जिल्ह्यांत सुरू झाली असून, लवकरच नंदुरबार जिल्ह्यामध्येही 100 टक्के निधीसह ती लागू करण्यात येईल, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात सिकलसेल असलेल्या रुग्णांसाठी अनेक योजना असून त्याचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागाने जवळपास 08 लाख नागरिकांची तपासणीचे नियोजन केले आहे. आतापर्यंत साडेतीन लाख नागरिकांची तपासणी पूर्ण केली असून 1 हजारपेक्षा जास्त दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
पुढे बोलतांना राज्यमंत्री म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘हेल्थ अॅक्शन सेंटर’ द्वारे उच्च जोखीम असलेल्या जवळपास साडेतीन हजार गर्भवती मातांना आणि साडेसातशे बालकांना ट्रॅकिंग करून बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे काम केले गेले, याचे विशेष कौतुक आहे. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असल्यामुळे रोजगाराच्या संधी राज्याबाहेर उपलब्ध होतात. यावर उपाय म्हणून जिल्ह्यात जास्तीत जास्त इंडस्ट्रीज उभ्या करून तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय संविधानाच्या बळावरच भारत देश जगात सर्वात मजबुतीने उभा असल्याचे सांगून, सर्वांनी एकोप्याने राहण्याचे आवाहन राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी केले.
*यांचा झाला सन्मान…*
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन – 2024 चे इंष्टांक वेळे पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, यांचा राज्यमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे.
*महसूल विषयक उल्लेखनिय कामकाज केल्याकामी महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार*
अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, नायब तहसिलदार बनशिलाल वाडीले, महसूल सहाय्यक माया मराठे, प्रितम नागदेवते, दिपक निळे, संगिता राठोड, ग्राम महसूल अधिकारी झेङ के. गायकवाड, महसूल अधिकारी अमित गावीत, तलाठी राजेश पवार, अरुण कोकणी, मंडळ अधिकारी मिथून राठोड, ग्राम महसूल अधिकारी राजश्री पाडवी, जे.डी. पाटील, जयेंद्र अहिरे, कपील परदेशी व ग्राम महसूल अधिकारी सुभाष पाडवी.
*खरीप हंगाम 2025 अंतर्गत “उत्कृष्ट शेतीशाळा आयोजित स्पर्धा विजेते.*
जिल्हा स्तरीय प्रथम अर्जुन पावरा, द्वितीय श्रीमती स्वाती गावीत, तृतीत प्रवीण पगारे, चतुर्थ सुरेश गावीत व पाचवा श्रीमती शितल सोनवणे, के.के. चौधरी, जे.जी. चौधरी व एम.बी. कायत.
*जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार इतर संबंधित अधिकारी तसेच विशेष कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांना प्रमाणपत्र*
जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी, पोलीस निरिक्षक हेमंत पाटील, निलेश देसले, हेमंतकुमार प्रभाकर पाटील, प्रभारी कार्यालय अधिक्षक संदीप सोनवणे, सहाय्यक पोलीस निरिक्षक जयेश खलाणे, धर्मराज पटले, पोलीस उपनिरिक्षक मुकेश पवार, महिला पोलीस उपनिरिक्षक प्रिया वसावे पोलीस हवालदार रतन रामोळे, नितीनकुमार साबळे, पोलीस शिपाई शिशिकांत राजपूत, जब्बार शेख, विलास पांढारकर, भिका गवळे, हेमंत बारी व महिला पोलीस नाईक कांती वसावे.
यावेळी सर्व उपस्थितांनी बाल विवाह प्रतिबंध शपथ घेतली. कार्यक्रमात एस.ए. मिशन प्राथमिक शाळा, डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल, गुजराती प्राथमिक शाळा नवापूर व अँग्लो उर्दू हायस्कूल नंदुरबार या विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी देशभक्तीपर, गीत, नृत्य व परेड मार्च सादर केले.
*पोलीस मुख्यालय येथे भुमिपुजन व अनावरण सोहळा*
पोलीस मुख्यालय येथे राज्यमंत्री गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन योगेश ज्योती रामदास कदम यांच्या हस्ते व्यायाम शाळा व बैठक कक्षाचे बांधकाम सोळ्याचे भुमिपुजन तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत अपारंपारिक सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी सोहळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी खासदार ॲड गोवाल पाडवी, विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, विधानसभा आमदार राजेश पाडवी, आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक आशित कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.








