Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ,23 लाखाची दारू पकडली.दोघांना अटक

team by team
December 26, 2025
in क्राईम
0
अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ,23 लाखाची दारू पकडली.दोघांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी-

अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करीत तब्बल 40 लाख 38 हजार 560 रुपये किमतीचे 232 पेटयांचा मुद्देमाल वाहनांसह जप्त केला.याप्रकरणी 2 संशयित आरोपी ताब्यात घेतले आहे.

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शहेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गाने गुजरात राज्यात एका पांढऱ्या रंगाच्या विना नंबरची टाटा कंपनीचा 407 मॉडेल हया वाहनामध्ये विनापास विदेशी दारुची वाहतुक होणार असुन त्या वाहनाला पांढऱ्या रंगाची सुजूकी व्हॅगनर पायलटींग करणार असलेबाबत खात्रीशिर माहिती मिळाली. सदर माहितीचे आधारे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले,

मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथक हे स्थानिक पोलीसांचे सोबत अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर रस्त्यावरील मोरांबा फाट्यावर येवून थांबले असता रात्रीचे वेळेस एक चारचाकी पांढऱ्या रंगाची वॅगनर वाहन व तिचे मागे पांढऱ्या रंगाची विनानंबरची 407 मॉडेल वाहन असे येतांना दिसले. सदर वाहनास बॅटरीचा इशारा देऊन थांबविण्याचा प्रयत्न करता सदर वाहने थोड्या अंतरावर जाऊन थांबले. व त्यातुन काही इसमांनी पोलीस आल्याचे पाहून तेथून पळ काढला. ताब्यात घेण्यात आलेल्या वॅगनर वाहन क्रमांक MP 09 ZB 3104 वरील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव इरफान असलम खान, रा. खलवाडी मोहल्ला, सेंधवा, ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश असे सांगितले. त्याचप्रमाणे विना क्रमांकाचे 407 मॉडेल चारचाकी वाहनावरील इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राकेश इंदारामजी मेघवाल रा. बोराळी, ता.शिरपूर जि.धुळे असे सांगीतले.

सदर वाहनांची तपासणी करता त्यामध्ये एकुण 23 लाख 38 हजार 60 रुपये किमतीच्या विदेशी दारुच्या प्लॅस्टीकच्या बाटल्यांचे 58 खाकी रंगाचे खोके, एका खोक्यात 04 पेटया अशा एकुण 232 पेटया व दोन

वाहने असा एकुण 40 लाख 38 हजार 560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. त्याअन्वये वरील इसमांविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ दादाभाई मासुळ, महेंद्र नगराळे, मोहन ढमढेरे, पोना चेतन साळवे, पोकॉ शोएब शेख अशांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार मध्ये भाजपाचा विजय रोखण्यासाठी घडवला गेलाय वोट जिहाद ; डॉ.हिना गावित

Next Post

नंदुरबार येथील एस. ए. चर्च येथे नाताळनिमित्त सामूहिक प्रार्थना

Next Post
नंदुरबार येथील एस. ए. चर्च येथे नाताळनिमित्त सामूहिक प्रार्थना

नंदुरबार येथील एस. ए. चर्च येथे नाताळनिमित्त सामूहिक प्रार्थना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add