Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मिशन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन: चिमुकल्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने सर्व थक्क

team by team
December 23, 2025
in शैक्षणिक
0
मिशन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन: चिमुकल्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने सर्व थक्क

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार येथील मिशन हायस्कूलमध्ये वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी आणि वैज्ञानिक मॉडेल्सनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी उपशिक्षणाधिकारी डॉ.निलेश लोहकरे यांनी वेद कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपप्राचार्य विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबीलसा, पर्यवेक्षक मीनलकुमार वळवी आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमास शुभेच्छा देताना डॉ. निलेश लोहकरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की नंदुरबार येथील विद्यार्थी राष्ट्रीयस्तरापर्यंत जावेत व नंदुरबार मधूनही शास्त्रज्ञ तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे असे म्हटले.प्रदर्शनातील मुख्य आकर्षणे या प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते १२ वीच्या २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांवर आधारित ७५ प्रकल्प सादर करण्यात आले.

यामध्ये शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये हायड्रोपोनिक शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय,हरित ऊर्जा, उद्योनमुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन तसेच “रोबोफेस्ट” अंतर्गत ऑफस्ट्रॅकल अवॉइंडिंग रोबो कार, स्पायडर रोबोट, पल्स रेट मॉनिटरिंग सिस्टीम, टोल गेट वेहिकल बॅरियर, वूमन सेफ्टी प्रोजेक्ट असे अनेक प्रकल्प विद्यार्थ्यां मार्फत सादर करण्यात आले,विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग केवळ प्रकल्प मांडून न थांबता, विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रयोगाची माहिती अत्यंत आत्मविश्वासाने प्रमुख पाहुणे व परीक्षकांना समोर सादर केली.

 

यावेळी इ. ५ ते ८ वी च्या गटाचे तज्ज्ञ परीक्षक प्रा.प्रियंका वळवी, प्रा.चंद्रकांत निकम, प्रा.प्रशांत पाटील तर ९ ते १२ वी या गटाचे प्रा.दीपक शिंपी, प्रा.संजोक्ता गिरासे, प्रा.प्रतीक्षा वळवी, प्रा. पल्लवी पोळ यांनी सर्व प्रकल्पांचे बारकाईने निरीक्षण केले. कल्पकता, मांडणी आणि सादरीकरण या निकषांवरून विजेत्यांची निवड करण्यात आली. प्रदर्शनाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

आजचे विद्यार्थी हे उद्याचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या या छोट्या प्रयोगांमधूनच भविष्यातील मोठे शोध लागतील,” असे गौरवोद्गार प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पालकांनी काढले.

या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रती ओढ निर्माण झाली असून, संपूर्ण परिसरात एस.ए.मिशन हायस्कूलच्या य उपक्रमाचे कौतुक होत आहे. या वार्षिक विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांनी तसेच प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा नगरपालिका नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील 1041 मतांनी विजयी

Next Post

मिशन हायस्कूल येथे ख्रिसमस निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन

Next Post
मिशन हायस्कूल येथे ख्रिसमस निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन

मिशन हायस्कूल येथे ख्रिसमस निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add