डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या ई-बस सेवेचा शुभारंभ
नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार बस आगारासाठी सद्य स्थितीत 10 इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ई-बस सेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते याप्रसंगी बसचे उद्घाटन करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा आणखी सुधारित व्हावी तसेच ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुखकारक करणाऱ्या सुधारणा केल्या जाव्यात, असे सांगून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी इ बस सेवेमुळे बस आगाराची सेवा आणखी गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रवाशांची समस्या आणि उपलब्ध सेवा व बस आगाराच्या अडचणी याची माहिती घेतली. एकूण 42 इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आलेली आहे. सद्य स्थितीत 10 इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या आहेत. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
याप्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतूक अधिकारी धुळे सौरभ देवरे , आगार व्यवस्थापक संदीप निकम , माजी नगरसेवक आनंदा माळी माजी नगरसेवक लक्ष्मण माळी माजी जि प सदस्य सागर तांबोळी, नंदुरबार बस आगारात सध्याअवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वळवी, सुपरवायझर, नीरज गोराखळे इंजिनीयर बस आगार, रवी मिस्तरी ठेकेदार आदीउपस्थित होते. उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी स्वतः बस मध्ये बसून प्रवास केला. याप्रसंगी त्यांनी बसमधील प्रवाशांना व बस आगाराला शुभेच्छा दिल्या.








