नंदुरबार l प्रतिनिधी
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसचे औचित्य साधून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ बसवण्यात आलेल्या गाय वासरूचा शिल्पाचे शुक्रवार सायंकाळी लोकार्पण करण्यात आले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ गाय वासरूचे शिल्प बसवण्यात आले आहे.हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गाईला मातेचे रूप मानले गेले असल्याने तिला गोमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. शुक्रवार दीपोत्सवाचा पहिल्याच दिवशी वसुबारसचे औचित्य साधून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी,शिवसेना जिल्हा प्रमुख माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी सभापती मनिषा वळवी,माजी नगरसेविका सोनिया राजपूत, माजी सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक राजेश परदेशी, परवेज खान,विलास रघुवंशी, रोशन कुरेशी,रियाज कुरेशी,फारूक मिस्तरी,फारुख मेमन,अमित रघुवंशी,ईश्वर चौधरी,गजेंद्र शिंपी,प्रेम सोनार,जगन माळी,महानगर प्रमुख विजय माळी,पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी,मोहितसिंग राजपूत,सुरेश घाटे,प्रमोद शेवाळे,बाजार समिती संचालक प्रकाश माळी,निंबा माळी,मोहिनीराज राजपूत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.