नंदुरबार l प्रतिनिधी
नगरपरिषदेचा योजनेंतर्गत शहरातील अंधारे चौकात विजयादशमीचा मुहूर्तावर तुळशी वृंदावनाचे शिल्प साकारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तुळस पवित्रता,भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे. ‘तुळशी वृंदावन जयाचे द्वारी, धन्य तो प्राणी संसारी’, असे तुळशी वृंदावनाचे महत्त्व सांगितले जाते.
विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवार दि.२ ऑक्टोंबर रोजी शहरातील अंधारे चौकात भक्तीचे प्रतीक असलेल्या तुळशी वृंदावनाचे शिल्प नगरपरिषद योजनेंतर्गत साकारण्यात आले आहे. चौकाच्या मध्यभागी गोलाकार कप्प्यावर दर्शनी भागात तुळशी वृंदावनाचे शिल्प बसवण्यात आले असून,त्याचे गुरुवारी उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी तुळशी वृंदावनाचे पूजन केले.
यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी सभापती कैलास पाटील,बाजार समिती सभापती दीपक मराठे, माजी जि.प देवमन पवार,माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, रवींद्र पवार,परवेज खान, वकील पाटील,हिरालाल चौधरी, गजेंद्र शिंपी,रियाज खाटीक,रोशन कुरेशी, फारुख मिस्तरी,वरत्या पाडवी, अमित रघुवंशी,पुष्पेन्द्र रघुवंशी,आनंद रघुवंशी, प्रेम सोनार,विजय माळी,जगन माळी, निंबा माळी, विनोद राजपूत,मोहितसिंग राजपूत, अतुल पाटील,अंबू पाडवी, नवीन बिर्ला, किशोर पाटील, प्रकाश माळी, सुरेश घाटे, दादाभाई मिस्तरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.








