नंदुरबार l प्रतिनिधी-
के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई येथे शस्त्रपूजन करण्यात आले.
सैन्यात वापरल्या जाणाऱ्या रायफल, बंदूक, एअरगन, तलवार, कुकरी, इत्यादी शस्त्रांचं पूजन आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, आदिवासी युवक क्रीडा कल्याण मंडळाच्या सचिव डॉ. विभूती गावित व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव ऋषिका गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल यांनी शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे असे सांगून शस्त्र पूजनाचे महत्त्व स्पष्ट केले.
राजेंद्रकुमार गावित यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विचारांची लढाई जिथे संपते तेथून शस्त्रांची लढाई सुरू होते.’ असे मत व्यक्त केले.तसेच विजयादशमी निमित्त सुरू झालेले हे विजय पर्व प्रत्येकाचा जीवनात विजयश्री घेऊन येवो असे म्हणत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विजया दशमीच्या शुभेच्छा दिल्या.
ऋषिका गावित व डॉ.विभूती गावित यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्राचार्य शरद पाटील, प्रल्हाद संदानशिव, भानुदास वळवी, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल व प्रवीण मोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रजनी करेले यांनी केले.








