नंदुरबार l प्रतिनिधी-
विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर शहादा तालुक्यातील वैजाली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज भगवा चौक येथे विठ्ठल रूखमाई मातेच्या मंदिराचे भूमिपूजन सोहळा राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
भूमिपूजन नंतर डॉ विजयकुमार गावित व माजी सैनिक लोटन पाटील व त्यांच्या पत्नी सौ रेखाबाई पाटील तसेच भागवताचार्य ह भ प हर्षल महाराज कुलकर्णी खरवडकर यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे, उद्योजक शशिकांत पाटील, सरपंच सुरेखा ठाकरे, माजी सरपंच बन्सीलाल मोरे,भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय पाटील ,पंचायत समिती माजी सभापती वीरसिंग ठाकरे, डॉ जगदीश पाटील, मणिलाल ठाकरे, संदीप पाटील, प्रदीप पाटील, हिम्मत पाटील, चंद्रकांत पाटील, गुलाब पाटील, अरुण पाटील, दिलीप पाटील, मंगेश पाटील, लोटन पाटील, संतोष पाटील,योगेश पाटील ,अनिल पाटील, पंकज पाटील, विनायक पाटील, पितांबर पाटील, विठ्ठल पाटील, छोटू पाटील, बटू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रफुल पाटील, जितेंद्र कोळी, माजी सैनिक खंडू सिंग गिरासे, त्र्यंबक साळुंखे, नानाभाऊ पाटील, भगवान पाटील, विलास सोमवंशी, तुळशीराम पाटील, प्रकाश पाटील, दिनेश पाटील, जगदीश पाटील, सौ पुष्पाबाई पाटील ,भिकुबाई पाटील, विमल पाटील, रेखा पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी हरिपाठ भजनी मंडळाचे व श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राचे सेवेकरी तसेच ग्रामस्थ पुरुष महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले की, मंदिर उभारणी केल्याने गावात सामाजिक व धार्मिक वातावरण तयार होते यातून येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा मिळते व विविध समाज उपयोगी कामांना चालना मिळते येणाऱ्या काळात मंदिर उभारणीसाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी तसेच गाव परिसराच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून येणाऱ्या काळात गावातील विविध कामासाठी लागणारा निधी स्थानिक विकास निधीतून दिला जाईल यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील यांनी केले. हरिपाठ भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांच्या यावेळी सत्कार करण्यात आला.








