माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते भाजपा तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नंदुरबार l प्रतिनिधी-
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात नंदुरबार तालुका भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी चालवली असून त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार शहरातील शहादा बायपास रस्त्यालगतच्या परिसरात भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून हे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक नागरिक यांना शुभेच्छा देऊन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याप्रसंगी विजय प्राप्त करण्याच्या तयारीला लागा अशा सूचना दिल्या.
माजी जि प शांताराम पाटील सदस्य भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जे. एन. पाटील, भाजपा जिल्हा पदाधिकारी रवींद्र गिरासे, माजी जि. प.सदस्य प्रवीण पाटील, सदानंद रघुवंशी,सरपंच विनोद वानखेडे, सरपंच योगेश गिरासे,सरपंच राजू मराठे, उपसरपंच मनोज गिरासे, उपसरपंच लोटन पाटील, उपसरपंच व्यंकट पाटील, ज्येष्ठ नेते बापू पाटील, प्रफुल्ल पाटील, तुषार पाटील, जुगल पाटील,अक्षय पाटील, अमोल भारती विविध गावातील सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.