नंदुरबार । प्रतिनिधी
नंदुरबार उपनगर व शहर पोलीस ठाण्यांतर्गत मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून एका अल्पवयीन बालकास या पकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत भा. न्या. स. कलम ३०३ (२) व नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत भा.न्या. स कलम ३०३ (२) प्रमाणे मोटर सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकिस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी पातोंडा तालुका नंदुरबार येथील १४ वर्षे सहा महिने वयाच्या अल्पवयीन बालकास ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडून १५००० रुपये किमतीची हिरो होंडा सीडी डीलक्स मोटर सायकल व पंचवीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची डेस्टिनी स्कुटी अशा एकूण ४० हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार सुनील येलवे, दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, चेतन साळवे यांच्या पथकाने केली.