धनगर आरक्षणाच्या वादातून आमदार आमश्या पाडवी यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ,गुन्हा दाखल करण्याची मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी-
धनगर आरक्षणाचा वादातून आमदार आमश्या पाडवी यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्ह्यातील आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी बिरसा आर्मीने पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शिंदे शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांना एका व्हिडीओद्वारे गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणाऱ्यांना गुन्हा नोंद करून अटक करावी;यासाठी बिरसा आर्मीने पोलीस निरीक्षक तळोदा यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक नंदुरबार व गृहमंत्र्यांना निवेदनद्वारे मागणी केली आहे.निवेदनाचा आशय असा की,एका व्हिडीओद्वारे घनश्याम हाके नावाचा माणसाने आमश्या पाडवीना कुत्र्यां,भडवे, आमश्या म्हणजे नासलेला,वास येणारा.असे कसे नाव असे म्हणत आदिवासींच्या नावाचा अपमान केला.आदिवासी समाजात रूढी- परंपरेनुसार व निसर्गातील काही नियमानुसार अशी नावे ठेवली जातात.घनश्याम हाके यांनी एका विधानसभा सदस्याला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून आदिवासी समाजातील नावाला नासलेले,वास येणारे उल्लेख करून जातीभेद मानून अपमानित केल्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ॲट्रॉसिटी कायदा कलम ३ (१)(दहा) नुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी.तसेच,सदर व्यक्तीचा गलिच्छ भाषेवरून दोन समाजात तेढ निर्माण करून दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनात येत असल्याने भारतीय न्यायसंहिता कलम २९९ नुसारही गुन्हा नोंद व्हावा.
बिरसा आर्मीसह आदिवासी समाज तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.निवेदनावर बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी,रापापूर-पाल्हाबार शाखाध्यक्ष शिवाजी तडवी, सल्लागार गणेश पाडवी, लक्कडकोट सचिव संतोष गावीत, उपाध्यक्ष दिनेश वळवी,रमेश पाडवी,गोविंद ठाकरे,आशिक वळवी,दादी पाडवी,बहादूरसिंग नाईक यांच्या स्वाक्षरी आहेत.