नंदुरबार l प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या सहकार्याने नंदुरबार एस.टी आगार परिसरात आयुर्वेदिक वनस्पतींची संकल्पना घेऊन तयार होत असलेले ‘आयुष गार्डन’ हा अभिनव उपक्रम असून तो स्तुत्य आहे, असे मत नंदुरबार जिल्हा पोलीस उपअधीक्षक संजय महाजन यांनी व्यक्त केले. ते नंदुरबार येथील एस.टी. महामंडळ आगाराच्या प्रांगणातील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या सहकार्याने साकारण्यात येणार्या आयुष गार्डनच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या सौजन्याने राज्य परिवहन नंदुरबार आगार परिसरात स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान -२०२५ अंतर्गत ‘आयुष गार्डन’ तयार करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस उपअधीक्षक संजय महाजन व नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक हेमंत पाटील हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नंदुरबार एस.टी.आगारप्रमुख संदीप निकम हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष विवेक जैन, सचिव राहुल पाटील, वाहक प्रकाश ईशी, एस.एस.पाडवी, असिस्टंट गव्हर्नर प्रितेश बांगड, ट्रेझरर जितेंद्र सोनार, प्रोजेक्ट चेअरमन नंदकिशोर सूर्यवंशी, प्रशांत कोटेचा आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संदीप निकम म्हणाले की भविष्यात ‘आयुष गार्डन’ हे नंदुरबार आगाराचे आकर्षणाचे स्थान म्हणून उदयास येईल. रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या माध्यमातून नंदुरबार बस स्थानकाच्या आगाराच्या परिसरात आयुर्वेदिक वनस्पतींचा बगीचा तयार होणार आहे. येथे प्रवाशांना प्रत्येक आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती मिळण्यासाठी त्या-त्या वनस्पतींचे माहितीचे फलक लावण्यात येणार असून सदर बगीचा हा प्रवाशांसाठी व नंदुरबार शहरातील जनतेसाठी भविष्यात खुला राहणार आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्रोजेक्ट चेअरमन तथा कृषी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी या आयुष गार्डनचे भविष्यात होणारे फायदे नमूद केले. यावेळी आयुष गार्डनमध्ये सुमारे ८० वनऔषधी रोपांचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे माजी अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सैय्यद इसरार अली, फखरुद्दीन जलगूनवाला, आकाश जैन, जितेंद्र पाटील, राजेश्वर चौधरी, प्रवीण पाटील, राजनसिंग चंदेल, विकास तोष्णीवाल, विनोद अंबानी, अंकित जैन, सनी जैन, किरण दाभाडे, अंकित जैन, रोट्रॅक्ट क्लबचे माजी अध्यक्ष मयुर जैन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक सागर पाडवी, सहाय्यक वाहतूक निरिक्षक सलिम मलिक, महेंद्र आगळे, लक्ष्मण अहिरे, यश कोकणी, दिनेश गायकवाड, दिलीप गायकवाड, संतोष पवार, प्रकाश ईशी, राकेश बेडसे, अशोक चौधरी, हेमंत मोहिते, कुणाल बारी, राकेश बेडसे, शेखर सोनवणे, सुनील मुंडे, अतुल हिरे, संतोष पवार, राजू पवार, सुभाष भास्करे, प्रकाश वंजारी, जगदीश राठोड, कांतिलाल साबळे आदींनी परिश्रम घेतले.