नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त विजय क्रीडा गौरव महोत्सव समिती आयोजित रस्सीखेच, फुटबॉल आणि लंगडी या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉ.हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
आ. डॉ विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच लागोपाठ दोन भव्य क्रीडा स्पर्धा पार पडल्या. त्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्याही वाढदिवसानिमित्त विजय क्रीडा गौरव समिती आयोजित तिसरी महा स्पर्धा पार पडली. या सर्वच स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आणि युवक युवतींनी अत्यंत चित्ताकर्षक खेळ सादर करीत उपस्थितांचे मन जिंकले. या माध्यमातून नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात कार्यरत असलेल्या क्रीडापटूंना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन प्राप्त झाले. यामुळे क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठे समाधान व्यक्त करण्यात आले.
माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी स्वतः खेळात सहभाग घेऊन या स्पर्धेचे उद्घाटन केले होते आणि स्पर्धकांचे मनोबल उंचावले होते. गेल्या दोन दिवसात पार पडलेल्या रस्सीखेच, फुटबॉल आणि लंगडी या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या बड्या शालेय संस्थांपेक्षा नगरपालिकेच्या शाळांमधील आणि अन्य छोट्या शाळांमधून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखवलेले कौशल्य विशेष उल्लेखनीय ठरले. नंदुरबार येथे अथलेटिक्स स्पर्धांसाठी सुद्धा चांगले विद्यार्थी उपलब्ध असून भविष्यात नंदुरबार जिल्हा अथलेटिक्स स्पर्धेत सुद्धा पुढे जाऊ शकतो हे यानिमित्ताने निदर्शनास आले. दरम्यान श्रॉफ हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या समारंभात सर्व विजेत्या संघांना आणि विद्यार्थ्यांना अत्यंत जल्लोषात पारितोषिक वितरण करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी तालुका अध्यक्ष जे एन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर तांबोळी, प्रवीण पाटील, वैदाने गावचे उपसरपंच डॉ मनोज गिरासे, क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे क्रीडा शिक्षक बळवंत निकुंभ क्रीडा शिक्षक राजेश शहा क्रीडाशिक्षक त्रिवेदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून सबस्टीन जयकर, आमोश डलगे, अक्षय परदेशी, संकेत डलगे, करण चव्हाण, योगेश निकम आदींनी काम पाहिले.
स्पर्धानिहाय विजेत्यांची नावे याप्रमाणे:
*फुट बॉल स्पर्धेतील विजेते संघ :*
१४ वर्षाआतील –
प्रथम – एस. आर. वॉरियर (रोहीत मडाले)
व्दितीय – मराठी मिशन (ग्लोरी गावित)
तृतीय – एन.एफ. सी (कार्तिक परमार)
* १७ वर्षाआतील-
प्रथम – एस. ए. मिशन इंग्लीश मीडियम (जयकर सर
व्दितीय – मराठी मिशन हायस्कूल (खुशाल शर्मा –
तृतीय – डि.एफ. सी (प्रविण माळी)
——-
*लंगडी स्पर्धा*
लहान गट (मुले)
* नगरपालिका शा.क्र.५ : प्रथम क्रमांक
* नगरपालिका शा.क्र.12 : द्वितीय क्रमांक
* ‘आदर्श मराठी विद्यामंदिर : तृतीय क्रमांक
लहान गट (मुली):
* न. पा. शाळा क्रमांक १ प्रथम
* आदर्श मराठी विद्या मंदिर -द्वितीय
* मो. क.रघुवंशी विद्यामंदिर : तृतीय
मोठा गट मुले.:
* नगरपालिका शा.क्र.4 : प्रथम
* नगरपालिका शा.क्र. 12 : द्वितीय
* नगरपालिका शा.क्र. .01: तृतीय
मोठा गट मुली :
* नगरपालिका शा.क्र. 4 : प्रथम
*नगरपालिका शा.क्र. 12 : द्वितीय
* मो क रघुवंशी विद्यामंदिर : तृतीय
——–
*रस्सीखेच अंतिम निकाल*
17 वर्ष मुले गट:
* द्रोणाचार्य स्पोर्टस क्लब, नंदुरबार
* शिवनेरी क्रीडा मंडळ, नंदुरबार
* भाग्य चिंतन विद्यालय, नंदुरबार
17 वर्षा मुलींचा गट:
* अभिनव विद्यालय, नंदुरबार
* इंदिरागांधी छात्रालय नंदुरबार
* सिताई हीडा मंडळ, नंदुरबार
19 वर्षावरील गट मुले
* द्रोणाचार्य स्पोर्टर्स क्लब, नंदुबार
* कष्टभंजन हनुमान क्रीडा मंडळ, नंदुबार
* एकलव्य क्रीडा मंडळ नंदुरबार
19 वर्षा मुली
* अभिनव विद्यालय, नंदुरबार
* इंदिरागांधी छात्रालय, नंदुरबार
* जळखेश्वर क्रीडा मंडळ, नंदुरबार
*