नंदुरबार l प्रतिनिधी-
शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार निधीतून अपंगांना ३ चाकी इलेक्ट्रिक चार्जेबल सायकल वाटप कार्यक्रम आज गौरी विसर्जन निमित्त करण्यात येणार आहे.
८० टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तींना इलेक्ट्रिक चार्जेबल सायकल शासनाचा योजनेतून देण्यात येते. परंतु,त्या पेक्षा कमी टक्केवारीतील अपंगांना त्याच्या लाभ मिळत नाही.दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हि जशी शासनाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाची देखील आहे. याच विचारातून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या आमदार निधीतून ७० ते ८० पेक्षा कमी टक्केवारीतील अपंगांना ३ चाकी चार्जेबल सायकल घेण्याचे निर्णय घेतला.
नंदुरबार नगरपरिषदेचा स्व.अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मंगळवार दि.२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,किरण रघुवंशी,परवेज खान,रवींद्र पवार, चेतन वळवी,कैलास पाटील, फारूक मेमन,दीपक दिघे,प्रमोद शेवाळे, ज्योती पाटील,भारती राजपूत,सोनिया राजपूत,प्रीतम ढंडोरे,फारूक मिस्तरी, रियाज कुरेशी, रोशन कुरेशी आदींनी केले आहे.