नंदुरबार l प्रतिनिधी
शासन आदेश नसतांना बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश घेण्याची सक्ती केली होती. अश्या शाळा शैक्षणिक संस्था यांच्यावर ठोस कारवाईची मागणीसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी दि २० ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू होते. उपोषणाचा ७ व्या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे, जिल्हा शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, प्रशासकीय अधिकारी सोनवणे यांनी शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देऊन संथा स्तरावर कारवाई करणेबाबत निर्देश देण्यात आल्याचे लिखित पत्र प्राप्त झाल्याने ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले.
गेल्या एक महिन्यापासून हिंदु सेवा सहाय्य समिती क्रीडा गणवेश संदर्भात पालकांची होणारी आर्थिक लूट थांबावी यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून तर निवेदन दिले परंतु तरीही न्याय मिळत नसल्याने हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर २० ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाचा सातव्या दिवशी शिक्षणाधिकारी यांनी क्रीडा गणवेश बाबत सक्ती करू नये अश्या आशयाचे पत्र शाळांना आधीच दिले होते आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई बाबत शिस्तभंगाचे प्राधिकरण शैक्षणिक संस्था असून त्यांना कारणे दाखवा नोटीस देणार असे लिखित पत्र शिक्षण विभाग मिळाल्याने गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले नरेंद्र पाटील यांनीं उपोषण मागे घेतले.
हिंदु सेवा सहाय्य समितीने दिलेल्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले. उपोषण दरम्यान अनेक संस्था, संघटना, पालक यांनी उपोषण स्थळी येऊन लिखीत, मौखिक पाठिंबा दिला त्या सर्वांचे आभार हिंदु सेवा समितीने आभार व्यक्त केले. उपोषण यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक जितेंद्र राजपूत, जयेश भोई, गणेश राजपूत, सुयोग सूर्यवंशी, पंकज मुसळे, संदीप राजपूत, पंकज डाबी, राजू चौधरी आदींनी परिश्रम घेतले.