नंदुरबार l प्रतिनिधी
जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, तोपर्यंत अल्पसंख्यांक समाजाने घाबरण्याचे काहीही कारण नाही. आम्ही विशिष्ट विचारधारेच्या पक्षाच्या सत्तेत असलो तरी त्यांची विचारधारा आम्ही स्वीकारलेली नाही. अजित पवार व राष्ट्रवादी पक्षाने अल्पसंख्यांक समाजावर मोठे उपकार केले आहेत. जेव्हा जेव्हा अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार अन्याय होतो तेव्हा तेव्हा अजितदादा अल्पसंख्यांक समाजा सोबत भक्कमपणे उभे राहतात. सत्तेत राहून अल्पसंख्यांकांची बाजू घेणारे एकमेव नेते म्हणजे अजित पवार ., असे प्रतिपादन अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार ईद्रीस नाईकवाडी यांनी केले.
जेके पार्कच्या सभागृहात आयोजित राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे हे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर जि प सदस्य मोहन शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवा अध्यक्ष सिताराम पावरा, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई सोनगरे, जगदीश जयस्वाल, नरेंद्र नगराळे, नंदुरबार शहराध्यक्ष मोहन माळी, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार, प्रमोद अमृतकर, शोएब खाटीक,पप्पू कुरेशी, युनूस पठाण, आरिफ शेख जाकीर मिया जहागीरदार, छोटू हाशमी , मा. नगरसेवक साजिद अन्सारी, खालील खाटीक, ईद्रिस पठाण , गुड्डू सैय्यद , अझहर मिया जहागिरदार, मुजम्मील हुसैन, मोईन खाटीक, सिकंदर कुरेशी , मुजाहिद सैय्यद , अदनान मेमन, नजमाताई मेमन, मालती ताई वळवी, इम्रान काकर, आदींसह अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष आमदार नायकवाडी म्हणाले की, मदरशा मधील मुलांना थंड पाणीने आंघोळ करावी लागत होती तेव्हा दादांनी सोलर प्लांट बसवून त्यांना गरम पाण्याची व्यवस्था केली. मदरशांच्या निधी वाढवला. प्रशासनामध्ये दादांचे वजन आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीमागे भक्कम उभा राहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी अल्पसंख्यांक समाजातील युवकांनी तसेच महिलांनी पुढे यावे. राजकारणात महिलांनी आपला सहभाग वाढवावा. यासाठी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने विशेष विंग स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्याचे अधिकार डॉक्टर अभिजीत मोरे यांनी घ्यावे. यासाठी बैठक बोलावून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अध्यक्ष निवडीच्या मार्ग मोकळा करावा. पक्षात अनेक पद आहेत. प्रत्येक पदांवर नियुक्ती करण्यात यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अल्पसंख्यांक समाजावर मोठे उपकार आहेत. त्याची परतफेड करण्यासाठी अल्पसंख्यांक समाजातील बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा, असे आवाहन आ. नाईकवाडी यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर अभिजीत मोरे म्हणाले की, अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया या शिक्षण संस्थेमध्धे केवळ मुस्लिम विद्यार्थीच नाही तरी विविध धर्मातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही पक्षातील नेत्यांनी या संस्थेला टार्गेट केलं आहे. ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. नवापूर तालुक्यामध्ये 75000 ख्रिश्चन बांधव आहेत. या भागातील बेकायदेशीर चर्चा तोडण्याचे मनसुबे काही पक्षाच्या नेत्यांचे आहेत. या संदर्भात काँग्रेसच्या आमदाराने कुठलेही भूमिका घेतली नाही. बोलण्यासारखं बरेच आहे परंतु हे सगळे मुद्दे निवडणुकीत मांडता येतील. आम्ही कुठल्याही मुद्द्यांचे राजकारण करू इच्छित नाहीत. परंतु या ठिकाणी विशेषता अक्कलकुवा व नवापूर तालुक्यात धार्मिक तेढ निर्माण करून अल्पसंख्यांक समाजाला टार्गेट केले जात आहे. ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा होता व यापुढेही उभा राहील अशी मी ग्वाही देतो, असेही डॉक्टर मोरे यांनी सांगितले. युनूस पठाण यांनी सूत्रसंचालन केले.
पक्ष प्रवेश
नंदुरबार शहरातून भाजपचे मुस्लिम नेते पप्पु कुरेशी, शिवसेनेचे उपशहर प्रमुख इम्तियाज कुरेशी, फत्तेपुरचे सलमान कुरेशी, एमआयएमचे अमिनोद्दीन शेख यांनी प्रवेश केला तर धानोरा गावातील शेकडो युवकांनी आणि महिलांनी योगेश वसावे, सुधाकर वसावे, राकेश वसावे, प्रथम वसावे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. त्याच प्रमाणे तळोदा तालुक्यातील खुशगव्हाण गावाचे सरपंच विलास पाडवी, सिद्धार्थ हिरालाल पाडवी इत्यादी सदस्यांनी दिपक दशरथ वळवी यांच्या नेतृत्वात प्रवेश केला.
त्याच प्रमाणे शहादा शहरातील अनिस अन्सारी, वसिम अण्णा अन्सारी, वसिम मेवाती, आवेश पठाण, अरमान वायरमन, अझहर मेवाती, कालु शेख, मोईन मुख्तार अन्सारी, फैजल अन्सारी, रफिक अन्सारी इम्रान अबु हसन, कुर्बान अन्सारी इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तर नवापुर शहरातून अनिस खाटीक, खलील खाटीक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.