हजारो भाविकांच्या शनिमांडळ येथे भरला भक्ती मेळा,श्रावणी शनि अमावस्या निमित्त भरली यात्रा
नंदुरबार l प्रतिनिधी-
तालुक्यातील शनिमांडळ येथे श्रावणी अमावस्या निमित्त येथील शनी मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी हजारो भाविकांची रांग लागली होती.
शनिमांडळ येथील शनी मंदिरात श्रावणी अमावस्या निमित्त यात्रा भरली यात दिवसभरात सुमारे 50 हजार पेक्षा अधिक भाविकांनी दर्शनाच्या लाभ घेतला. याप्रसंगी महाराजांना तेल व नारळ अर्पण केले.
शनिमांडळ हे साडेसाती मुक्तीचे स्थान म्हणून ओळखले जाते या ठिकाणी शनी अमावस्या निमित्त येणारे भाविक आपली साडेसाती दूर व्हावी म्हणून शनिदेवांना तेल नारळ अर्पण करतात. तसेच पुरोहितांकडून अभिषेक करून घेतात. यामुळे साडेसाती चा प्रभाव कमी होतो.
विविध मान्यवरांची हजेरी.
माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी संसद रत्न खा. डॉ हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित, पोलीस उपाधीक्षक संजय महाजन, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्यासह विविध मान्यवरांनी दर्शन घेतले.
यावेळी मंदिर संस्थांचे अध्यक्ष अरुण पाटील, सचिव संतोष पाटील, कार्याध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष डॉ सयाजीराव मोरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.