नंदुरबार l प्रतिनिधी
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून आयोजिलेल्या विविध क्रीडा स्पर्धांसाठी नावनोंदणी करावी; असे आवाहन समस्त क्रीडापटूंना विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीने केले आहे.
विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती नंदुरबार तर्फे नंदुरबार जिल्हा मर्यादित क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 24/08/2025 व 25/08/2025 या कालावधीत श्रॉफ हायस्कुल नंदुरबार, एस.ए. मिशन हायस्कुल नंदुरबार, जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे संपन्न होणार आहेत. या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळा विद्यालयातील स्पर्धाकांची नावे नोंदणी करावी, तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यालयातील खेळाडूंनी विद्यालयाच्या मुख्यध्यापकांचे सहीचे जन्म तारखेचा पुरावा म्हणून बोनाफाईड सर्टिफिकेट व सोबत आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन विजय गौरव क्रीडा समिती नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेचे ठिकाण आणि नाव नोंदणीसाठी क्रमांक
यात टग ऑफ वार म्हणजे रस्सीखेच स्पर्धा 17च्या आतील आणि 19 वर्ष वयोगटातील स्पर्धकांसाठी एस.ए. मिशन हायस्कुल मैदानावर होईल. 17 वर्षाआतील मुले वजन-470 kg गटासाठी 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली आहे. 17 वर्षाआतील मुलींच्या (वजन-390 kg) गटासाठी 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली आहे. याच प्रमाणे 19 वर्षाआतील मुलांच्या (वजन 550 kg) गटासाठी 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली आहे. तर, 19 वर्षाआतील मुलींच्या (वजन 430 kg) गटासाठी 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली आहे. फुटबॉल स्पर्धेत देखील 14 वर्षाआतील मुलांच्या गटासाठी 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक आणि 17 वर्षाआतील मुलांच्या गटासाठी 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. यासाठी स्पर्धकांनी ईश्वर धामणे (9422285709), बलवंत निकुंभ (8788876044) योगेश निकुंभ (9764227116) यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे पत्रकात म्हटले आहे.
लंगडी स्पर्धा- ठिकाण : श्रॉफ हायस्कुल, नंदुरबार- गट 10 वर्षाआतील मुले (1 ली ते 4 थी) – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. मुली (1 ली ते 4 थी) – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. 12 वर्षा आतील मुले (5वी ते 7वी) – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. 12 वर्षा आतील मुले (5वी ते 7वी) – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. संपर्क प्रमुख-करण चव्हाण (8668546842), जगदिश वंजारी (9403384539), तुषार सोनवणे (7972082645).
बॅडमिंटन स्पर्धा: ठिकाण- जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार – गट 17 वर्षाआतील मुले – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. 17 वर्षा आतील मुली – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. गट 19 वर्षाआतील मुले – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. 19 वर्षा आतील मुली – 5000, 3000, 2000 असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक. संपर्क प्रमुख-भिकू त्रिवेदी (9226753077), राजेश शहा (9423191312).