नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील राष्ट्रीय अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती शाखा नंदुरबारतर्फे बेदमुदत संप पुकारण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी,
कर्मचान्यांच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्यांसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली होती. त्यानुसार काल नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले. यावेळी जि.प. मुख्याधिकारी नमन गोएल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के समायोजन करावे, मानधन वाढ न करता दरवर्षी ८ टक्के व एक वेळची बाब म्हणून १० टक्के प्रमाणे वार्षीक वाढ करावी, अशा विविध मागण्या आहेत. या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. याप्रसंगी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदुरबारचे जिल्हा समन्वयक धिरज गावित, मनोहर धिवरे, लक्ष्मी माळी, मनोज चौधरी, डॉ. योगेंद्र पाडवी, डॉ. गौरव सोनवणे, शिरीष भोजगुडे, डॉ. वर्षा सुळे, दिनेश वानखेडे, बाळासाहेब राऊत, शकुंतला ब्राम्हणे, जसूबाई पावरा, भावेश पाटील, निलेश शर्मा, गोपाल बुनकर, अॅड. गीतांजली पाडवी आदी उपस्थित होते.